भाजपाच्या ‘ आयटीसेल ‘ उत्तर महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी जळगावचे गिरीश नारखेडे यांची नियुक्ती

जळगाव – भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश आयटीसेल कार्यकारिणीमध्ये उत्तर महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी जळगावचे गिरीश नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी नुकतीच ही नियुक्ती एका पत्रकाद्वारे केल्याचे जाहीर केले आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ‘ आयटीसेल ‘ची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी जाहीर केली आहे. राज्यातील विदर्भ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण- ठाणे, विदर्भ पूर्व अशा विविधविभागांचे संयोजक आणि सहसंयोजक पदे जाहीर करण्यात आली आहेत. जाहीर झालेल्या या नियुक्त्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रात प्रदेश संयोजकपदी गिरीश नारखेडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर पक्षाने सोपविलेल्या संयोजकपदावर ते पूर्णक्षमतेने काम करतील असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्री. नारखेडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस विविध क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यात सामाजिक कार्यकर्ते, कलावंत तुषार वाघुळदे यांनी पेढा भरवून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.