भुसावळ -येथील लिनेस गृपच्या वतीनें शालेय विद्यार्थिनीना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येवून मुलींना स्त्री रोग तज्ञ डॉ वृषाली चौधरी यांचे मार्गदर्शन झाले .
भुसावळ येथील डी .एल .हिंदी हायस्कूलमध्ये सुमारेषा १५० मुलींना सॅनिटरी पॅड वाटप व त्याविषयी सतर्कता व मार्गदर्शन केले. त्यावेळेला प्राचार्य श्री मती एस .टी .अडवाणी सहाय्यकअध्यापिका सौ .आर .जी. पाठक, कुमारी अर्चना रमेश शर्मा सौ सायली बेंडाळे ,या उपस्थित होत्या व डॉक्टर ऋषाली चौधरी यांनी मुलींना सॅनिटरी पॅड वापरण्याविषयी सतर्कता व मार्गदर्शन अतिशय योग्यरित्या इ केले .तसेच लिनेस ग्रुपच्या सदस्या सौ अनिता आंबेकर यांनीही मुलींना मार्गदर्शन केले. आयोजक विजया निकम , अध्यक्षा प्रियंका चौधरी ,शिरीष सोहळे, रचना तांबोळी, विजया निकम ,जया इंगळे ,अनिता आंबेकर अनिताN इंगळे या सर्व सदस्या उपस्थित होत्या.



