पत्रकार संदीप महाजनांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करा : व्हॉइस ऑफ मिडीयाचे प्रांताधिकारी यांना निवेदन ! –


भुसावळ (प्रतिनिधी) पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी व्हॉइस ऑफ मिडीयाचे सुरेश उज्जेनवाल यांचेसह श्रीकांत जोशी , संजयसिंग चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्षा उज्वला बागुल यांच्या नेतृत्वात आज ११ ऑगष्ट रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीयाच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देतेवेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे. तसेच लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष उज्वला बागुल, व्हाईस ऑफ मिडीया तालुका सचिव सुनील आराक,व्हाईस ऑफ मिडीया संतोष शेलोडे , शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी , हबीब चव्हाण , निलेश फिरके, अभिजीत आढाव, वसंत कोलते, राजू चौधरी, कलीम पायलेट, सलाउद्दीन आदिब, संजय काशीव, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, सद्दाम खाटीक, सतीश कांबळे, गोपी म्याद्रे, राहुल वानखेडे, सुरेश महाले, निलेश वाणी, आकाश ढाके, रवींद्र कोलते, राजेश तायडे, कालू शहा, कैलास उपाध्यय आदी पदाधिकारी ,सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते