भुसावळ – ठाकरे गट शहर शिवसेनेच्या वतीने भुसावळ शहरात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी सुकन्या समृध्दी योजना या योजने मध्ये ० ते १० वर्षांपर्यंतच्या मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढले जाते नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी शिवसेनेच्या वतीने सर्व पोस्ट ऑफिस मधील स्टाफ शिवसेना कार्यााालयात उपस्थित राहणार आहे .
या योजने मध्ये मुलींना १५ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात ह्या योजनेचे खाते२५० रु मध्ये काढले जाते १८ वर्ष पूर्ण झाल्यावर सुकन्या योजने मधील ५० टक्के रक्कम ही काढता येते २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा लग्नाच्या वेळेस सुकन्या योजनेतील संपूर्ण रक्कम काढता येते या योजने मध्ये कमीत कमी २५० रु तर जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रु आपण जमा करू शकतो
त्याच प्रमाणे भारतीय डाक विभागाचा अपघाती विमा फक्त३९९ रु मध्ये १० लाख रु वार्षिक विमा
या योजने मध्ये ३९९ रु मध्ये महिला व पुरुष या दोघांचा विमा काढला जातो अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रु मिळतात अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास १० रु मिळतात
अपघातातील वैदकिय खर्चासाठी आंतर रुग्ण खर्च ६० हजार तर बाह्य रुग्ण खर्च ३० हजार रुपये दिला जातो
अपघत विमा धरकाचा मृत्यू झाल्यास १० लाख रु वातिरिक्त २ अप्त्यांसाठी १ लाख रु शैक्षणिक खर्च दिला जातो
अपघात झाल्यानंतर कुटुंबाला दवाखान्यातील प्रवासा साठी २५ हजार रु खर्च दिला जातो व इतर ही बरेच फायदे ह्या योजने मध्ये आहे
तसेच महील सन्मान योजना
ही योजना विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना असून महिला या योजनेत खाते उघडून त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात. महिला सन्मान बचत पत्र म्हणजे MSSC योजना २०२५ पर्यंत किंवा २ वर्षांसाठी असून या बचत योजनेत ७.५ टक्के व्याज दिला
या सोबतच इतर शासकीय योजनेचा लाभ घेणे साठी दीं १९ व २० तारखेला शिवसेना संपर्क कार्यालाय जुना सातारा येथे सकाळी ९ ते २ वा उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांनी केले आहे.



