भुसावळ शहरात रेल्वेची पेन्शन अदालत : दहा तक्रारींचा निपटारा :

भुसावळ : रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात गुरुवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. दाखल 71 तक्रारींपैकी केवळ दहा तक्रारी या पैशांविषयी होत्या तर अन्य 61 तक्रारी पैशांविषयी नसल्याने पैशांविषयी तक्रारींचे निरसन करून 10 लाख 54 हजार 316 रुपये पेन्शनर्सच्या खात्यात वर्ग करण्यात आले तसेच पी.पी.ओ.चे व परीवार पेन्शनचे रिव्हीजन करण्यात आले. पेन्शनर्सच्या तक्रारीचे संपूर्ण निराकरण यावेळी करण्यात आले. पेन्शन अदालतीत अपर मंडल रेल प्रबंधक सुनीलकुमार सुमन, लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.एस.काज़ी यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे यांनी केले. भुसावळ, खंडवा, जळगाव, अकोला पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील व यंदाचा एरीयर्स रेल्वे कर्मचार्‍यांसह सेवानिवृत्तांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस. वडनेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सेटलमेंट विभाग आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक यांनी सहकार्य केले.