भुसावळ तहसीलदारांची मालेगाव येथे बदली ;

भुसावळ : राज्यातील महसूल संवर्गातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार श्रेणीतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी सोमवार,१२ जून रोजी काढले आहेत. त्यात भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांची मालेगाव धान्य वितरण अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे . दरम्यान भुसावळ तहसीलदारांच्या जागी कुणाची वर्णी लागणार? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
नवीन तहसीलदार कोण येणार ? याबाबत अद्याप आदेश काढण्यात आले नसून लवकरच त्याबाबत आदेश निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.