तहसिलमधील बंद पंखे त्वरीत सुरू करावे – केदार सानप यांची मागणी


भुसावळ –
येथील तहसिल कार्यालयात भुसावळ शहर व
तालुक्यातील तरूण, वृद्ध व दिव्यांग व्यक्ती येत
असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहसिल
कार्यालयातील बंद पंख्यांमुळे अतिशय त्रास सहन
करावा लागत आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी
असलेल्या रॅम्प समोर ट्रॅक्टर उभे केल्याने दिव्यांग
व्यक्ती रॅम्प वरून ये-जा करू शकत नाही. त्यामुळे
त्यांना तहसिलमधील बंद पंखे
त्वरीत सुरू करावे – केदार सानप यांची मागणी अडचणीला सामोरे जावे
लागत आहे. तरी संबंधितांनी याची दखल घेवून
तहसिल कार्यालयातील बंद पंखे तात्काळ सुरू
करण्याची व रॅम्प समोरील उभे असलेले ट्रॅक्टर
हटविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती
प्रांत जितेंद्र पाटील यांना दिलेल्या तक्रार अर्जात
केदारनाथ सानप यांनी केली आहे.