शहरात महामंडळाच्या पास सुविधा केंद्र सुरू होणार :

भुसावळ -कोरोना काळापासून वरणगाव शहरांमध्ये विद्यार्थी नोकरदार व ऐच्छिक पासधारकांना पास काढण्यासाठी भुसावळ येथे जावे लागत होते परंतु शहरांमध्ये पास सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असून याची पाहणी करण्यासाठी भुसावळ येथील आगार प्रमुख राकेश शिवदे व भुसावळ बस स्थान प्रमुख प्रकाश भोई यांनी भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांसाठी महामंडळाच्या सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले

देशभरामध्ये कोरोनाचा कहर पसरल्यानंतर संपूर्ण देश थांबला होता यावेळी शाळा देखील बंद झाल्याने राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून वरणगाव येथे सुरू असलेले पास सुविधा केंद्र बंद करण्यात आले होते शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी व नोकरदार यांना पास काढण्यासाठी भुसावळ येथे जावे लागते यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास देखील सहन करावा लागत होता याकरिता महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी वरणगाव शहरात पास सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी आगार प्रमुख राकेश शिवदे यांच्याकडे केली होती यामुळे आगार प्रमुख राकेश शिवदे व भुसावळ बस स्थानक प्रमुख प्रकाश भोई यांनी महात्मा गांधी विद्यालय व कुऱ्हा पानाचे येथे रा धो माध्यमिक विद्यालयात भेट देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी 15 जून पासून सुविधा सुरू करणार आहेत यामुळे 700 पेक्षा जास्त विद्यार्थी नोकरदार व हवे तिथे फिरण्यासाठी चार किंवा सात दिवसाचे पास महात्मा गांधी विद्यालयातील पास सुविधा केंद्रावर मिळणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचे होणारी हाल अपेष्टा थांबवता येणार आहे यावेळी मुख्याध्यापिका वंदना चव्हाण उप मुख्याध्यापक पी जे पाटील पर्यवेक्षक बी एम राठोड सुनील वानखेडे आदी उपस्थित होते

विद्यालयाला दिली भेट

येथील महात्मा गांधी विद्यालयात आगार प्रमुख राकेश शिवदे व भोई यांनी भेट देऊन शालेय वेळा तसेच विद्यार्थ्यांच्या सुविधासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व ग्रामीण भागातून शहरापर्यंत सहजासहजी विद्यार्थ्यांना पोहोचता यावे यासाठी वेळेची नियोजन करून बस वेळेवर ती मिळावी यासाठी नियोजन करणार आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या विविध सुविधा येथे उपलब्ध करणार आहेत

बस स्टैंड वर होणारी गर्दी कमी होईल

भुसावळ तालुक्यात वरणगाव व कुरे पानाचे या दोन गावांना अनेक खेडे लागून आहेत यामुळे वरणगाव व भुसावळ येथे शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त आहे या विद्यार्थ्यांना गावातच पास सुविधा उपलब्ध केल्याने भुसावळ बस स्थानकात पास काढण्यासाठी होणारी गर्दी कमी होईल तसेच विद्यार्थ्यांना होणारा त्रास देखील कमी करता येणार आहे

राकेश शिवदे आगार प्रमुख भुसावळ