आज पासून शाळेची घंटा घनघनू लागली. पहिल्याच दिवशी ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये ९० टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती ; विद्यार्थांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर दणाणला:


भुसावळ – . येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडियम स्कुल सोमवार पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी शाळेतील इयत्ता नर्सरी ते १० वी चे ९० टक्के विद्यार्थांनी शाळेत हजेरी लावली.
विद्यार्थी सकाळी शाळेत येताच शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर व त्यांच्या शिक्षिकांनी शाळेत आलेल्या विदयाथ्र्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थासाठी शिक्षिकांनी स्वागत गीत गाऊन व नृत्य सादर करुन विद्याथ्र्यांचे स्वागत केले.
यावेळी शाळेतील विद्याथ्र्याना प्रिंसिपल निना कटलर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगीतले की आज शाळेचा पहिला दिवस असून शाळेत नित्य नियमाने यायचे, आपला युनिफॉर्म व रोज चा अभ्यास करायचा. आजू बाजूच्या मुलांचे खोड्या काढू नये. चांगले शिक्षण घेऊन आई वडीलांचे व शाळेचे नाव रोषण करावे.शाळेत सायकलीने लांबहून येजा करणाऱ्या विद्यार्थांना वाहतुक नियमांच्या सुचना दिल्या, उन्हाचे तापमान जास्त असल्याने डोक्याला व कानाला रुमाल बांधण्यास सांगीतले, व शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून सतत पाणी पिण्याचे सल्ले दिले.
गेल्या दीड महिण्यांपासून शाळेला सुट्ट्या होत्या. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळेतील विद्यार्थी उत्साहात दिसून आले. पालकवर्ग देखिल उत्साहाने त्यांच्या मुलांना सकाळीच शाळेत सोडण्यासाठी आले होते.
विद्यार्थांनी गुरुजनांचे आभार मानले.
यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांच्यासह सोनाली मुजूमदार,स्मिता जाधव,मनप्रित कौर,ऍनेट मॅथ्यू,हर्षला चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सुत्रसंचलन सोफीया पीबॉडी यांनी तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले.
.