भुसावळ – येथील नुपुर अँकेडमीचे संचालक यांची कन्या नूपुर रमाकांत भालेराव हीने
हिमाचल प्रदेश मध्ये सोलन येथे झालेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत सेमी क्लासिकल मध्ये प्रथम क्रमांक व कथक नृत्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीत भुसावळच्या नावलोकिक वाढवले आहे .
हिमाचल प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच सामाजिक न्याय मंत्री कर्नल डॉक्टर धनिराम शांडिल्य यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
तसेच या स्पर्धेत कथक डूएट मध्ये रमाकांत व चारू भालेराव यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.



