भुसावळ येथे दावत इस्लामी हिंदचे जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न


भुसावळ : दावते इस्लामी हिंदच्या हज व उमरा विभागांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भुसावळ ज्युनियर रेल्वे इन्स्टिट्यूट येथे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय हज प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, ते यशस्वीरित्या संपन्न झाले प्रशिक्षक फारुख चिश्ती साहिब धुलिया यांनी हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देताना अहेराम घालण्याच्या पद्धती, तवाफ, सई पद्धत, परिक्रमा आणि तकसीर तसेच हज दरम्यान येणाऱ्या समस्यांवर उपाय आणि त्यांच्या व्यावहारिक पद्धती बद्दल माहिती दिली तसेच हाजी सलीम अत्तारी राष्ट्रीय सदस्य दावत-ए-इस्लामी हिंद यांनी मदिना येथील शिष्टाचार आणि पैगंबर मोहम्मद साहब यांच्या मजारला भेट देण्याची पद्धत आणि संघटने बद्दल माहिती दिली तसेच दावते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष श्री जुबेर अत्तारी यांनी नमाज आणि प्रार्थना करण्याची पद्धत शिकवली. या सभेला संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी मौलाना इलियास कादरी यांनी लिहिलेले रफिक उल-हरमान हे पुस्तक
हज यात्रेत अतिशय उपयुक्त आहे म्हणून कार्यक्रमत येणारे सर्व भाविकांना भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमचे शेवटी भारताच्या प्रगतीसाठी आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. ही सभा यशस्वी करण्यासाठी हाजी शाकीर कादरी, अजहर कादरी, फरीद शेख, सईद अत्तारी युसूफ बरकती, शोएब अत्तारी, आसिफ अत्तारी, ईमरान अत्तारी रफीक रोशन कादरी यांनी प्रयत्न केले.