भुसावळ.- येथिल ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये दोन दिवशीय सेमीणारचे आयोजन दि ८ जून पासून करण्यात आले आहे. यात शाळेतील शिक्षकांसाठीचे हे सेमीणार ठेवण्यात आले आहे. गुरुवारी या सेमिणार मध्ये गुजरात येथिल आयआयएम अहमदाबाद मधील श्रेया ललवाणी यांनी ताप्ती पब्लीक सीबीएसई च्या शिक्षकांना नॅशनल एज्युकेशन पॉलीसी अंर्तगत शिक्षकांनी प्रभावी पद्धतीने शिकवणे, विद्यार्थ्याचे शिक्षण नियोजन, विदयाथ्र्यांची मानसिकता समजून घेऊन प्रभावी पणे शिक्षण देणे अशा विवीध विषयांवर मार्गदर्शन केले. तर शाळेत शिक्षकांनी विदयार्थ्याची काळजी घ्यावी, विदयार्थांना शिकवत असतांना व्यवस्थित शिकवावे असे मार्गदर्शन शाळेच्या प्रिंसिपल निना कटलर यांनी केले.
यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांच्यासह सोनाली मुजूमदार, स्मिता जाधव,मनप्रित कौर, ऍनेट मॅथ्यू,हर्षला चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार सोफीया पीबॉडी यांनी केले.



