भुसावळ – येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समस्या समाधान शिबीर कार्यक्रम २६ में रोजी कमल गणपती हॉल येथे तहसिल कार्यालय व ए. बा. वि. से. यो. भुसावळ ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार दिपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळ रजनी संजय सावकारे आणि देवेंद्र राऊत -(म. बा.क) जी. प जळगाव होते. तसेच सदर कार्यक्रमास शालेय पोषण आहार अधिकारी आरिफ तडवी ,उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सि .डी .तायडे ,गटविकास अधिकारी प्रतिनिधी काळे ,पशुसंवर्धन अधीकारी डॉक्टर एस. आर. तायडे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संगीता दवंगे ,महिला समुपदेशन केंद्र-समुपदेशक भारती म्हस्के ,विस्तार अधिकारी अनिल सुरळकर उपस्थित होते.
यावेळी रजनी सावकारे यांनी आपल्या भाषणात महिलांनी समस्या असल्यास संबंधित विभागाकडे जाऊन मांडाव्या असे प्रतिपादन केले.
राऊत यांनी उपस्थित महिलांना शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार धिवरे यांनी महिलांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल व सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल अशी ग्वाही दिली.
“आम्ही कटिबद्ध आहोत”या मासिक पाळी संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छतां विभागाच्या सप्ताह कार्यक्रमाबाबत जयश्री जोशी यांनी उपस्थितांना माहिती दिली.
प्रास्ताविक रोझतकर व आभार प्रतिक पाटील तसेच सूत्रसंचालन जयश्री दवे यांनी केले. याठिकाणी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. महिलांनी आपल्या समस्या मांडून माहिती घेतली. कार्यक्रमास ४०० हून अधिक महिला हजर होत्या, आरोग्य विभागातर्फे भुसावळ शहराचे तापमान पाहता उपाययोजना म्हणून कार्यक्रमस्थळी दोन अँम्ब्युलेंसची सोय करण्यात आली होती. यशस्वीतेसाठी तहसीलचे नागरे , शोभा जाधव,आयसीडीएस विभाग ग्रामीण भुसावळ, संरक्षण अधिकारी स्टाफ यांनी परिश्रम घेतले.



