भुसावळ : तालुक्यातील फुलगाव येथील भिल्ल वस्तीत झाडा-झुडूपांमध्ये जुगाराचा डाव रंगला असतानाच गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापेमारी करीत चार जुगार्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ४० हजार १५० रुपयांची रोकड जप्त केली तर दोन संशयित पसार झाले आहेत.
या कारवाईने जुगार्यांमध्ये खळबळ उडाली.
या प्रकरणी संशयित आरोपी भूषण अशोक माळी (३५, वरणगाव) यांच्या फिर्यादीवरून धनराज केशव महाजन (५४, फुलगाव), लखन राजू माळी (२४, सावतर) ,सोपान उत्तम कोळी (४७, ओझरखेडा), जितेश पुंडलिक कठोरे (३४, वढवे), प्रवीण युवराज सुरवाडे ३२, तळवेल), जितू पाटील (३२, फुलगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नावेद अली करीत आहेत.



