आई-वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यास गेलेल्या शिक्षकाचा रेल्वेतून पडून मृत्यु ; चाळीसगावच्या दुर्देवी घटनेने हळहळ


चाळीसगाव-आई-वडिल हरिद्वार येथे जात असल्याने त्यांना रेल्वे स्थानवर पोहचवून रेल्वे बसवून रेल्वेतून उतरत असतांना पाय घसरून रेल्वे गाडीत अडकल्याने झालेल्या दुर्देवी अपघातात शिक्षकाचा मृत्यु झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास घडली.या दुर्देवी घटनेेने आनंदी असलेल्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
माळशेवगे येथील रहिवासी असलेले योगेश गंभीरराव सुर्यवंशी(41) हे माध्यमिक विद्यालय चिंचगव्हाण येथील शाळेत शिक्षक असून ते आईवडिल व कुटुंबासह विवेकानंद कॉलनी, बाप्पा पॉंईट, भडगाव रोड येथे राहत होते. त्यांचे आई व वडिल हे हरीद्वार येथे जात असल्याने त्यांना सोडण्यासाठी आज पहाटे रेल्वे स्थानकावर गेले. आई वडिलांना पहाटेच्या दादर-अमृतसर ए्नसप्रेसमध्ये बसवले. त्याचवेळी गाडी सुरू झाल्याने योगेश पाटील हे घाईत रेल्वे गाडीतून उतरतांना रेल्वेगाडीत ओढले गेल्याने त्यांचा मृत्यु झाला. हा प्रकार प्लॉटफार्मवरील इतर प्रवाशांचा लक्षात येताच त्यांनी धाव घेतली पण काही उपयोग झाला नाही.
या घटनेची माहीती मिळताच योगेश सुर्यवंशी यांच्या मित्रांसह त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली.मृत शिक्षक योगेश सुर्यवंशी यांच्यावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यंाच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा रामा वाघ यांचे जावई होत.