भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला तीन लाखांचा गंडा –

भुसावळ : भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याची सोशल मिडीयावरील खात्यावर लिंक पाठवून अज्ञात भामट्याने सुमारे तीन लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मनोजकुमार सुनहरीलाल राज (४५ भोईटे नगर, जळगाव) हे भुसावळ येथे रेल्वेस नोकरीला आहे. त्यांच्या सोशल मिडीयावरील टेलिग्राम खात्यावर अज्ञात भामट्यांनी युपीआयद्वारे लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ०४ हजार पाचशे रुपयांची रक्कम वळती केली. हा प्रकार ८ ते १२ मे दरम्यान घडला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.