भुसावळ – भुसावळ तालुक्यातील निंभोरा व कपिलवस्ती नगर मधील दोघे तरुण मोटरसायकलने खेडी येथे लग्नासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधूवन जवळ – रस्त्याच्या कडेला मोटरसायकल उभी करून लघुशंका करण्यासाठी थांबले असता मध्य धुंद अवस्थेत फॉर्म्युनर वाहन चालकाने युवकांना धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार झाला असून दुसरा तरुण जखमी झाला असून गोदावरी रुग्णालयात उपचार घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील हॉटेल मधूवन समोर सायंकाळी साडेसात वाजता साखरी ब्रिज जवळ फॉर्च्यूनर क्रमांक एम एच १९ ई. डी ०४४५ में भरधाव वेगाने येऊन मोटरसायकल क्रमांक एम एच १९ सी बी २६७९ जोरदार धडक दिल्याने या अपघातात शेख इरफान शेख रेहमान यास गोदावरी रुग्णालयात मृत घोषित केले आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर मध्ये आणले आहे तर गौतम वाघ हा गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती


