नागपूर येथे रविवार दि. २८ मे रोजी “आपलं तेली समाज संघ, महा. राज्य ” चा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा “

भुसावळ – संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या आशीर्वादाने आपलं तेली समाज संघ, महाराष्ट्र राज्यचा पहिला वधू-वर परिचय मेळावा दि. २८ मे २०२३ रोजी, जवाहर विध्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे सकाळी १० ते ४ या वेळात अतिशय उत्साहासाच्या वातावरणात संपन्न होणार आहे. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त कामगिरी करणारे पदाधिकारी “ प्रमुख पाहुणे ” या सदराखाली तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे समाज बांधव-भगिनी “ आदरणीय मान्यवर ” या सदराखाली लाभलेले आहेत. या मेळाव्याचे वैशिष्ठय म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात धार्मिक क्षेत्रांच्या विकासा अंतर्गत श्री. संताजी जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर करिता ६ कोटी रुपये आणि श्री. संताजी जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) करिता २५ कोटी रुपये याप्रमाणे तेली समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या भरीव आर्थिक सहकार्याबद्दल ” सत्कार मूर्ती ” या सदराखाली . देवेंद्र फडणवीस, उपमुख्यामंत्री यांना बोलवून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे या संघाचे संस्थापक अध्यक्ष श गुणवंत वाडीभस्मे – मुंबई यांनी सांगितले.

यानिमित्ताने सर्वशाखीय तेली समाजातील सर्व स्थरातील विवाहोत्सुक वधू-वरांच्या बायोडाटाची नोंदणी रविवार दि. २८ मे २०२३, सकाळी ७ वाजता पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जास्तीत-जास्त संख्येने करावी. आपले नोंदणी शुल्क भरल्यावर वधू-वरांचा बायोडाटा व आपल्या मोबाईलचा स्क्रीनशॉट 7506032550 या नंबरला पाठविण्याचे सांगण्यात येत आहे तसेच सदर मेळावा कार्यक्रमाला दि. २८ मे २०२३ रोजी सकाळी उपस्तीथी लावावी असे संघाचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत वाडीभस्मे – मुंबई, यांचेकडून सांगण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन नागपूर विभागीय अध्यक्ष – श्री. विलास बुटले, नागपूर विभागीय उपाध्यक्ष – श्री. अशोक खंते, नागपूर जिल्हा अध्यक्ष – . अजय हिंगे, नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा – सौ. मंजुषाताई लोहबरे, नागपूर जिल्हा महिला उपाध्यक्षा – सौ. वीणाताई खंते, श्री. लक्ष्मणजी सातपुते, सौ. नंदाताई गिरीपुंजे या पदाधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. या मेळाव्यात विदर्भातील सर्व जिल्हे उदा. नागपूर / भंडारा / चंद्रपूर / गोंदिया / वर्धा / गडचिरोली / अमरावती / अकोला / यवतमाळ / बुलढाणा / वाशीम अश्या सर्वच जिल्हा सोबत महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील सर्वच स्तरातील मुले-मुली आपला परिचय देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने हा मेळावा ” न भूतो, न भविष्यती ” असाच असेल अश्या प्रकारच्या तेली समाज बांधवांच्या प्रतिक्रिया येत आहे.सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भुसावळ आपल तेली समाज जिल्हाध्यक्ष संजय बळीराम चौधरीं तालुकाध्यक्ष उज्वला बागुल , यांचेसह पदाधिकारी यांनी केले आहे