विविध मागण्यांसाठी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ भुसावळ तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन :

भुसावळ : व्हॉईस ऑफ मीडियाच्या भुसावळ तालुका कार्यकारणी तर्फे आज भुसावळ येथे पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार श्रीकांत जोशी, संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजयसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच संघटनेच्या तालुका अध्यक्ष उज्वला बागुल यांच्या मार्गदर्शनखाली , जोरदार आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर काम करणारी ‘व्हाईस ऑफ मिडिया’
संघटनेतर्फे आज गुरुवार दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता
तहसीलदार कार्यालय भुसावळ येथे एकदिवशिय धरणे आंदोलन करण्यात आले आहे . लोकशाहीच्या चौथा खांब हा पत्रकार असतो, परंतु या
वंचित घटकाला न्याय मिळत नाही. याकरिता जिल्हाध्यक्ष सुरेश
उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने हे आंदोलन
केले जाणार आहे. यात पूढील प्रमाणे मागण्या – १) पत्रकारांसाठी
• स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव
निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना
सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. ३) वृत्तपत्रांना सध्या
जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. ४) पत्रकारांच्या
घरांसाठी ‘म्हणून । विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय
घ्यावा. ५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन
वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन
करावे. ६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु
दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम ( ब वर्ग)
दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या
प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी भुसावळ तालुका व्हाइस ऑफ मीडियाचे सर्व
पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनाला उपस्थिती द्यावी असे आवाहन , सचिव सुनील आराक ,संजय काशिव , सतीश कांबले, सुनील वानखेड़े , मनोहर लोने , प्रेम परदेसी , संजय ठाकुर , मनीषा शिरतुरे ,यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .