लिनेस क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा संपन्न ‌: अध्यक्षपदी सौ प्रियंका चौधरी ,सेक्रेटरी सौ वैशाली सैतवाल :


भुसावळ – लिनेस क्लबचा नुकताच पदग्रहण सोहळा संपन्न झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लीनेस क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट सौ शिरीष सोहळे तसेच प्रमुख पाहुणे एम जे एफ लॉयन डॉक्टर भोलाणे व लॉयन ट्रेझरर विनोद सोहळे होते .
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा बलके यांनी केले .लिनेसच्या अध्यक्षपदी सौ प्रियंका चौधरी तर टेझर म्हणून अनुप्रिता बारजीभें व सेक्रेटरी म्हणून सौ वैशाली सैतवाल यांचेसह डायरेक्टर बॉडी मध्ये सौ अनिता आंबेकर ,मनीषा धांडे ,अनिता इंगळे, पूजा बलके, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . सर्व नवनिर्वाचित सदस्यांना मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .