ओसवाल पंचायती भवनामध्ये श्रमणसंघीय अचार्यसम्राट आनंद ऋषीजी महाराज यांची पुण्यतिथी संपन्न :

भुसावळ– येथील बालाजी गल्लीतील ओसवाल पंचायती भवनांमध्ये श्रमणसंघीय द्वितीय पट्टधर आचार्यसम्राट गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज यांची 31 वी पुण्यतिथी जप, तप, ध्यान,सामाईक द्वारे
श्रद्धासुमन व आदरांजली अर्पण करून मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे निमंत्रक जैन कॉन्फरन्सचे ज्ञानप्रकाश योजना अध्यक्ष व जैन तत्वातील प्रबुध्द ज्ञानी प्रेम भाऊ कोटेचा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या प्रसंगी सौ.संगीता मुगदिया, सौ.पारस नाहाटा यांनी आचार्य सम्राटआनंद ऋषीजी यांच्यावर स्तवन सादर करून सुरुवात केली. डाँ. कुंदन कोटेचा, डाॅ.संदीप कोटेचा, सौ. ज्योती गादिया, श्रद्धा नहार आदींनी आचार्यांबाबत मत व्यक्त केले.

याप्रसंगी चातुर्मास समितीचे अध्यक्ष अनिल कोटेचा जैन यांनी आपला पदभार नूतन चातुर्मास समिती अध्यक्ष टॅक्स कन्सल्टंट प्रशांत पी कोटेचा यांच्याकडे सुपूर्द करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .भावी चातुर्मास हा चांगल्या रीतीने संपन्न होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी श्री. प्रेम भाऊ कोटेचा यांनी ऊदबोधन करतांना संघ, समाज, धर्म, आनंदऋषी महाराज यांचे जीवन यांच्यावर प्रकाश झोत टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन आनंद ड्रेसेस चे संचालक सुनील कोटेचा यांनी केले.
याप्रसंगी बहुसंख्य जैन श्रावक व श्राविका उपस्थित होत्या. सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन व जप ,तप ,ध्यान ,व संयम याचा परिचय दिला .