भुसावळ – येथील सक्षम कौन्सिल फाउंडेशनच्या सक्षम काउंसलर अध्यक्षा सौ आरती चौधरी यांना महिला दिनानिमित्त नुकताच ‘ मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा ‘ राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार पुणे येथील स्वप्नल फाउंडेशन तर्फे पुणे येथे देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या “मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील जवळपास 40 मान्यवरांचा गौरव करण्यात आला या सोहळ्याच्या उद्घाटन सिने अभिनेता प्रदीप देवकर यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लेखक चित्रपट निर्माते संदीप राक्षे हे होते विशेष अतिथी म्हणून होम मिनिस्टर खेळाचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर होते .

कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नल फाउंडेशनचे अध्यक्ष शोभा बल्लाळ सह आयोजक रूपाली यादव मयूर बल्लाळ ,रवी सावंत सई गोंधळेकर, उज्वला गायकवाड , सुजाता दळवी होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्वे तसेच डॉ दत्ता कोहिनकर, माजी नगरसेविका रेखा खोपकर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील हिरूरकर, विठ्ठल जाधव राजेंद्र भारूड हे उपस्थित होते. यावेळी आरती चौधरी यांनी सामुपदेशन च्या माध्यमातून तुटणारे संसार उभारत समाजामध्ये एक सकारात्मकता निर्माण केली आहे. म्हणुन हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कारार्थी सौ आरती चौधरीं यांचे सर्वत्र कौतुक होत असून शहरासह परिसरातील मान्यवर , जेष्ठ नागरिक , मित्र परिवार यांचेसह सर्व हितचिंतक यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .


