पालिकेच्या शाळेमध्ये ओपन व्यायाम साहित्य लावावे – मुस्लिम मंचची मागणी :

भुसावल – नगर पालिका शाळा क्रमांक 3 मध्ये ओपन व्यायाम शाळेचे साहित्य लावणे बाबत मुस्लिम मंच भुसावळ तर्फे मागणी करण्यात आली .

मोहम्मद अली रोड रजा टावर जवळ उर्दू शाळा क्रमांक 20 21 22 25 मध्ये शिकत असलेले विद्यार्थी यांच्या शारीरिक विकास होण्यासाठी व या भागातील राहणारे नागरिकांसाठी नगरपालिका शाळा मध्ये ओपन व्यायाम शाळेचे साहित्य लावण्यात यावे असे निवेदन एस डी एम आणि नगरपालिका चे सीईओ यांना देण्यात आले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड मध्ये जसे ओपन व्यायाम शाळेचे साहित्य लावण्यात आले आहे त्याप्रमाणे मोहम्मद अली रोड रजा टावर जवळ असलेली उर्दू शाळा क्रमांक तीन मध्ये सुद्धा ओपन व्यायाम शाळाचे साहित्य लावण्यात यावे मुस्लिम मंच भुसावळ तर्फे निवेदन देण्यात आले यापूर्वी मागील वर्षी देखील निवेदन देण्यात आले होते . या भागात व्यायाम शाळेचे साहित्य लावण्यात यावे असे मुस्लिम मंच भुसावळ अध्यक्ष साबीर शेख मुजाहिद शेख जुनेद अश्रफ युनूस मामा नजर शेख साजिद बागवान सलीम गवली साजिद रोशन तर्फे मागणी करण्यात आली