भुसावळ- येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला सदरहू मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी इंग्रजी विषयात गोल्ड मेडल मिळविलेली प्रा.कु.शिबा खान हिच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी डॉ.मोहन फालक तर प्रमुख पाहुणे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि माजी विद्यार्थी महेश फालक ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संजयकुमार नाहाटा महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पाटील,उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती शोभा तळेले हे होते,

यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील मेळावा समन्वयक डॉ.आशिष चौधरी हे उपस्थित होते या मेळाव्यात सन 2012 ते 2022 पर्यंत पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झालेले सुमारे 85 माजी विद्यार्थी सहभागी होते.या सर्व माजी विद्यार्थ्यांचा संघटनेतर्फे प्रा.हर्षल पाटील प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे प्रा.डॉ.गौरी पाटील,प्रा.स्वाती शेळके यांनी सत्कार केला या मेळाव्याचे उद्घाटन उद्घाटक प्रा.कु. शिबा खान यांनी झाडाला पाणी देऊन केले यावेळी सन्माननीय सर्व व्यासपीठावरील पाहुणे देखील उपस्थित होते. सुरुवातीला व्यासपीठावरील उद्घाटक ,अध्यक्ष तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचा माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला यानंतर महाविद्यालयातून क ब चौ उ म वि च्या विविध प्राधिकरणांवर निवडून आलेले बोर्ड ऑफ स्टडीज सदस्य प्रा.डॉ.पी.ए अहिरे प्रा.डॉ.जी आर वाणी यांचा माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहनभाऊ फालक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यानंतर मेळाव्या विषयीचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. जी आर वाणी यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितलं की सदरहू मेळावा आपण कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी घेतलेला आहे तसेच पुढील महिन्यात येत असलेल्या नॅक टीम सोबत आपणास हितगुज करायचे असल्याने आपण किती तत्परतेने त्या विषयाचं गांभीर्य घ्यावं याविषयीचे प्रास्ताविक तसेच संघटनेची भूमिका विशद केली कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा कु शिबा खान हिने आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं की महाविद्यालय हे आपलं दुसरं घर असतं आपण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपलं हे घर जेव्हा सोडतो तेव्हा आपल्याला दुःख होत असतं आणि म्हणून आज पुन्हा या घरात आल्यावर मला आनंद होत आहे तसेच या महाविद्यालयाने मला खूप काही दिलेलं आहे मी जे काही समाजात जगते आहे ते सर्वस्वी या महाविद्यालयाची शिकवण आहे असे मनोगत केले. यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांपैकी प्रा.अदनान अहमद,विजयसिंह सोनवणे,रितेश भारंबे प्रा.भूपेंद्र बनाईत इ.माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली त्यांनी प्रत्येकाने आपल्या मनोगतातून महाविद्यालयाची उज्वल परंपरा कशी आहे महाविद्यालयाने जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा आम्ही आमचं जीवन जगत असताना कसा उपयोग करतो या महाविद्यालयातील शिक्षक किती नम्रपणे विद्यार्थ्यांना शिकवतात तसेच आपण आपली जडणघडण करत असताना या गोष्टींचा कसा उपयोग करतो याविषयीचं मार्मिक असं उद्बोधन त्यांनी आपल्या मनोगतातून केलं,जगाला चालवणारे जे लोक असतात ते म्हणजे शिक्षक असतात हे त्यांच्या मनोगतातून प्रकर्षाने जाणवलं यानंतर माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे यांनी नॅक टीम आल्यावर आपणास कोणकोणत्या गोष्टी विचारू शकते त्या गोष्टींना आपण कशी उत्तर द्यायची तसेच आपण संवाद साधताना कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात याविषयीचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक यांनी सांगितले की महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थी संघटनेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे महाविद्यालयाचा विकास होत असताना त्यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य हे विसरता येत नाही आणि म्हणून त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे कौतुक केलं तसेच मेळाव्यास शुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना जर महाविद्यालयाकडून कोणत्या अडीअडचणी असतील तर त्यांनी सांगाव्यात जेणेकरून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मेघा चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ.गौरी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील,प्रा.दीपक पाटील,प्रा.चंद्रकांत सरोदे,प्रा. स्वाती शेळके,प्रा.डॉ.सचिन येवले,प्रा.सचिन कोलते,प्रा संगीता भिरूड, यांनी परिश्रम घेतले.


