शिरसाळा येथून दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात : दोघे तरुण गंभीर जखमी :

बोदवड – तालुक्यातील शिरसाळा येथून हनुमानाचे दर्शन करून परत येत असतांना सारोळा – माळेगाव दरम्यान एका
अज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने दुचाकी स्वारास कट मारल्याने झालेल्या अपघातात बुऱ्हाणपूर येथील दोघे तरुण जखमी झाले . यात एका तरूण किरकोळ जखमी झाला तर एकाचा पाय तुटून गंभीर जखमी झाला त्यास पुढील उपचारार्थ बुऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले.

याबाबत सविस्तर असे की, शनिवार दि. 21 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजता शिरसाळा ता. बोदवड येथून श्री. मारुतीरायाचे दर्शन घेवून बऱ्हाणपूर कडे परत येत असताना सारोळा – माळेगाव दरम्यान वळण रस्त्यावर एका अज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने कट मारल्याने जोरदार अपघात झाला या अपघातात मनोज प्रमोद ठाकुर (वय-20), मोहित गणेश महाजन (वय- 19 ) रा . बुऱ्हाणपूर हे जखमी झालेले असून मनोज ठाकुर गंभीरं जखमी झाला त्याचा पाय अपघातात जागीच तुटल्याचे समजते .
दरम्यान याप्रकरणी मुक्ताईनगर
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पो.कॉ.गणेश मनुरे, पो.कॉ.धर्मेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी घाव घेतली तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका आरोग्य सेवक प्रदीप काळे, चालक रवी जंगले यांनी सुद्धा लागलीच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले प्रसंगी मनोज ठाकूर यांचा तुटलेला पाय पिशवीत टाकून आणावा लागला अशी माहिती प्रदीप काळे यांनी दिली.
जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात डॉ शोएब खान, डॉ प्रशांत रामवंशी, आरोग्य सेवक प्रदीप काळे, परिसेविका कल्पना नगरे, सुनीता कसबे आदींनी उपचार केले. तसेच जखमींना पुढील उपचारार्थं जखमींच्या नातेवाईकांच्या सहमतीने बुऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले.