भुसावळ पालिका वैद्यकीय अधिकार्‍यांसह दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन – मुस्लिम मंच भुसावळची प्रसिद्धी माध्यमांना माहिती

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या दवाखान्यात प्रसुतीदरम्यान विवाहिता सायमा शाह यांचा 23 डिसेंबर रोजी मृत्यू ओढवला होता. या प्रकारास पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर व त्यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या परीचारीका जवाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती मुस्लीम मंचच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी माध्यमांना दिली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.
यावेळी मृत मुलीचे वडील अकील शहा, साबीर मेंबर, युनूस मामा, जुनेद खान, फिरोज शेख, मुजाहिद शेख, हाजी सलीम पिंजारी, सिकंदर मेंबर, फिरोज कुरेशी, नजर शेख, आबीद शेख, सली गवळी व अन्य मुस्लिम मंचचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.