भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे तर डॉ.सुरज भोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी,संजय नाहाटा, प्रिन्सिपल निना कटलर आदींची उपस्थिती राहणार असून सकाळी १o वा कार्यक्रमाला सुरुवात होणार असून नर्सरी ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थी थिरकणार आहे.
दि.१९ रोजी ट्रामा सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉ.मयूर चौधरी,जवाहर नवोदय चे प्रिन्सिपल आर.आर.खंडारे, जळगांव केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल मैथ्यू अब्राहम,सिक्रेट हार्ट चर्च चे फादर आजो यांची उपस्थिती राहणार असून संध्याकाळी ५ वा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून इयत्ता ५ वी ते १o वी चे विद्यार्थी धम्माल करणार असल्याचे प्रिन्सिपल निना कटलर यांनी कळविले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने यंदा हे स्नेहसंमेलन महत्त्वाचे असणार आहे. ताप्ती पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थी व पालकांना स्नेहसंमेलनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



