सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांकरिता स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन :

भुसावळ – श्री दादाजी फाउंडेशन व नरेंद्र मोदी विचार मंच (भारत) व जय हनुमान आयटीआय भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांकरिता रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध होणे करिता सोमवार दिनांक 2 जानेवारी रोजी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी हस्तकला विभाग भारत सरकारचे औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी बोलविण्यात आले होते. त्यांच्याकडून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणे करिता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमात जय श्री दादाजी फाउंडेशनचे अध्यक्ष व नरेंद्र मोदी विचार मंच चे राष्ट्रीय सचिव सौ योगिता मालवी, तसेच दादाजी फाउंडेशनचे सचिव उमेश मालवी, जय हनुमान आयटीआय भुसावळचे संचालक राज फालक, जय श्री दादाजी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जयश्री इंगळे , मुख्य समन्वयक चंद्रशेखर जोशी, अमळनेर तालुकाध्यक्ष अतुल पाटील, भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद जिल्हा सचिव चंद्रशेखर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते . प्रसंगी मेळाव्यात सहभागी
सर्व महिलांकरिता प्रीती भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.