भुसावळ – भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रपंडित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये गट क्रमांक – 1) ज्येष्ठ नागरिक (महिला व पुरुष ) व गट क्रमांक- 2) महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असुन स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे :
१) बदलत्या काळातील पत्रकारांची भूमिका
२) पत्रकारितेतील नवे आयाम
३) प्रिंट मिडिया , ईलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया यांची विश्वासार्हता
४) मला आवडलेली बातमी
वरील पैकी एका विषयावर कमीत कमी २०० व जास्तीत जास्त ५०० शब्दात निबंध मोबाईलवर टाईप करून अथवा कागदावर लिहून त्याचा फोटो काढुन 5/ 1 / 2023 दुपारी दोन वाजे पर्यंत अॅड. नितीन खरे यांचे मो. न. 9823223939 व श्रीकांत जोशी यांचे मो. न. 9881136143 पाठवावा. विजेत्यांना समारंभपूर्वक स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. इतरांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. असे भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब शेख, प्रकल्प प्रमुख उज्वला बागुल यांनी कळविले आहे.



