जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त महिलांना आरोग्याचे धडे- मानिनी फाउंडेशन व महिला समन्वयाचा उपक्रम :

भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील जनजाती वस्तीवर जागतिक ग्रामीण महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
मानिनी फाउंडेशन, महिला समन्वय व विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला विधी समितीकडून ॲड जास्वंदी भंडारी , मानीनी फाउंडेशनच्या सौ जयश्री इंगळे राजश्री संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेच्या राजश्री सुरवाडे महिला मुक्ती मोर्चाच्या संगीताताई भामरे आदी मान्यवरांनी कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
भुसावळ वकील संघ महिला प्रतिनिधी ॲड जास्वंदी भंडारी यांनी जागतिक ग्रामीण महिला दिन का साजरा केला जातो व महिलांचे कायदे व शासकीय योजनांची माहिती दिली विधी सेवा समिती भुसावळच्या वतीने अपंगांविषयी माहिती व योजनांविषयी नागरिकांना माहिती दिली. राजेश्री ताई सुरवाडे यांनी महिलांना मासिक पाळीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी स्वच्छता नाही ठेवली तर कर्करोगा सारख्या गंभीर आजार होवू शकतो असे मार्गदर्शन करून सेनेटरी पॅडचे महत्व सांगितले.
सौ संगीताताई भामरे यांनी महिलांनी चुलमुल या चौकटीत न राहता बाहेर पडावे व घराला व कुटुंबाला सांभाळण्या सोबतच स्वतःला आत्मनिर्भर बनवावे महिलांना कोणताही त्रास होत असेल तर संपर्क करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ जयश्रीताई इंगळे यांनी केले यात त्यांनी मानिनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली श्रमिकांना शासनामार्फत मिळणारा योजना कसे राबविले जातात घरापर्यंत येऊन कच्चामाल देऊन वस्तू बनवून त्या विकण्यापर्यंत संस्था सहकार्य करते असे यावेळी त्यांनी सांगितले .
कार्यक्रमात वस्तीवरील महिलांना सेनेटरी पॅडचे वाटप करण्यात आले सर्व संघटनांच्या समन्वयाने व गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.