भुसावळ – गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने सर्वांची दिवाळी ही अंधारात होती त्यामुळे बुधवारी भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी फुलझडी,फटाके,अनार,बॉम आदीसारखे फटाके फोडून दिवाळी साजरी केली.
शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर तसेच श्रद्धाली घुले, सोनाली मुजुमदार,स्मिता जाधव,अर्जून सनस,विजय संकत,अकबर खान यावेळी उपस्थित होते. प्रिंसीपल निना कटलर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व सांगितले.तसेच घरी सुद्धा फटाके फोडताना काळजी घ्यावी,मोठे फटाके लहान मुलांनी फोडू नये व फटाके फोडताना आपल्या आई-वडिलांसोबतच फोडावे अशा सूचना देखील यावेळी त्यांनी केल्या. विद्यार्थ्यांनी शाळेत फटाके सोबतच विविध प्रकारचे आकाश कंदील बनवून आणलेले होते. या आकाश कंदील ने शाळेतील परिसरच बदलून गेला होता. सर्व वर्गांमध्ये लखलख प्रकाश पडत होता. जणू आजच काय दिवाळी असं चित्र आज ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये दिसत होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना व एकमेकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देखील यावेळी दिल्या.



