अंजाळा घाटात अपघात तीन गंभीर जखमी

भुसावळ प्रतिनिधी :- यावल तालुक्यातील अंजाळा घाटात सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान घाटातून जाणाऱ्या दहा चाकी ट्रकला मागून येणाऱ्या बसने ब्रके फेल झाल्याने अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
भुसावळ-हिंगोणा बस सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान अंजाळा घाटातुन जात असतांना बसचे ब्रेक फेक झाल्याने ड्रायव्हरने प्रवाशांना सांगितले कु कोणी ही जागेवरून हलू नये.मी बरोबर बस कंट्रोल करतो.पण प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाल्याने ते उडी मारण्याची तयारीत होते.या अपघातात बस चालकांची कुठलीही चूक नसतांना त्यांनी प्रवाशांना वाचविण्याच्या प्रयत्न केला त्या दरम्यान घाटातून जाण्यासाठी दुसरा रस्त्या नसल्याने नालाईजास्तव बस चालकाला धडक मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता यामुळे हा अपघात झाला.यामध्ये भालोद येथील एक महिला,भुसावळ मधील एक पुरुष तर निबोल एनपूर मधील एक पुरुष असे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये भुसावळ मधील प्रवाशी खाजगी दवाखान्यात डॉ.तुषार पाटील यांच्याकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.अपघात झाल्या ठिकाणी दुचारी वरून जाणारे चंद्रकांत लालजी वायकोळे व ज्ञानेश्वर मोहन महाजन राहणार यावल तालुक्यातील पिळोदा गावातील असून यांनी अपघात झाला वेळीस बस मधील जखमींना काढून सहकार्य केले.घटना घडल्यानंतर बस चालक प्रवाशांना वाऱ्यावर सोडून फरार झाले. महिला कंडाक्टर असल्याने ती बसमध्ये थांबलेली होती.महामार्ग पोलीस केंद्र पाळधी ए.एस.आय.गुलाब मनोरे, पो.हे.कॉ. अनिल सपकाळे,पो.हे.कॉ पंकज बडगुजर,पो.ना.मिलिंद सोनवणे, पो.हे.कॉ प्रदीप रनीत यांनी अपघात ठिकाणी भेट देऊन अपघाताच्या दोघही बाजूनी वाहनांच्या रांगा दोन ते तीन तास लागलेल्या होत्या ती सर्व वाहने महामार्ग पोलीस केंद्रच्या पथकाने सुरळीत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *