वरणगाव – 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता या परीक्षेमध्ये भुसावळ शहरातील तिघांनी राज्यस्तरावरती प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना नुकतेच पारितोषिक देण्यात आले
माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात एचसीएल कंपनीचे सायबर सिक्युरिटी अभियंता सूरज वानखेडे माध्यमिक शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष प्रशांत नरवाडे संचालक डॉ संजीव भटकर ग स सोसायटीचे संचालक योगेश इंगळे नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे पी सपकाळे शिक्षक परिषदेचे जिल्हा नेते सुरेश अहिरे कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळाचे सहसचिव सुनील वानखेडे डॉ समीर चौधरी डॉ आरती चौधरी डॉ लीना चौधरी डॉ महेंद्र चौधरी प्रा स्वाती चौधरी प्रा कुंदन चौधरी आदी उपस्थित होते
एमटीएस परीक्षेत इयत्ता तिसरीतून कुश महेंद्र चौधरी इयत्ता चौथी तून रिधिमा समीर चौधरी तर इयत्ता सातवी या वर्गातून जिष्णू कुंदन चौधरी या तिघांनी राज्यस्तरावरती प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना प्रत्येकी रोख सहा हजार रुपये चा धनादेश स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले



