भुसावळ – गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे मुले पळवणारी टोळी आली असून अमुक अमुक ठिकाणाहून मुले पळवून नेली असल्याबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. समाज माध्यमावर कोणतीही वस्तुस्थितीची शहानिशा न करता संदेश फिरत असल्याचे निदर्शनात आले आहे.संदेश काळजी पूर्वक बघितले असता जवळपास सारखेच असून केवळ गाव, शाळा, मुलाचे नाव बदललेले दिसून येत आहे.
भुसावळ पोलीस उपविभागाकडे अशा स्वरूपाची सद्यस्थितीत एकही तक्रार प्राप्त नाही. फिरत असलेल्या संदेशानुसार महाराष्ट्रात कुठे गुन्हे दाखल असल्याचे देखील ऐकिवात नाही मागे देखील काही वर्षांपूर्वी असेच संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे काही ठिकाणी निर्दोष लोकांना मारहाणीच्या घटना देखील महाराष्ट्रात घडल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे.
तरी पोलीस प्रशासन म्हणून आम्ही सदर संदेशाबाबत गंभीर असून शाळेच्या ठिकाणी साध्या गणवेशात गस्त यापूर्वीच सुरू केली आहे तसेच शाळा प्रशासनाशी संपर्क करून त्यांना देखील सतर्क व सजग राहण्याचे व खबरदारी बाळगण्याचे कळवित आहोत.
तसेच जबाबदारीने सर्व जनतेस व पालकांना डीवायएसपी वाघचौरे यांनी आवाहनकेले आहे की सदर प्रकाराबाबत दक्ष राहणे गरजेचे असले तरी विनाकारण ताणतणावात राहू नये काही माहिती मिळाल्यास तात्काळ मला ,पो स्टे ला वा dail 112 वर कळवावे कोणत्याही संदेशावर डोळे बंद करून विश्वास न ठेवता त्याच्या सत्येतेची खात्री करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला परस्पर मारहाण करू नका कोणी संशयास्पद आढळून आल्यास पो स्टे ला कळवा. काही लोक विनाकारण अफवा पसरून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम करीत आहे. म्हणून सदरच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची कोणतीही घटना आपल्या परिसरात घडलेली नाही. त्यामुळे मुले चोरणाऱ्या टोळीबद्दल असणाऱ्या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये.अशा प्रकारची अफवा विविध माध्यमांमधून नागरिकांमध्ये पसरविणाऱ्या लोकांवर देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणी असे कृत्य करू नये.असे आवाहन भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .



