भुसावळ – शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त कलागुणांना सुद्धा वाव मिळावा , त्यांचेही कौतुक व्हावे , प्रोत्साहन मिळावे म्हणून भुसावळ येथील महिला क्रिडा मंडळाच्या महिलांनी पुढे सरसावून तालुक्यातील साकरी येथे महिलांच्या स्पर्धा घेऊन त्यांचे कौतुक करुंन बक्षिस वाटप केले.
यामध्ये रांगोळी, पाककृती , पोस्टर
सुदृढ बालक स्पर्धा या
दोन वयोगट(6म ते 3 वर्ष आणि 3-6वर्ष) अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर स्पर्धेसाठी महिलांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील महिला यांचा समावेश होता.
पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांनी सूत्रसंचालन, व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी सांगितले की प्रत्येक महिलेत काही ना काही सुप्त कलागुण असतात असे कलागुण जोपासूनच जीवनाचा आनंद घ्यायचा असतो असेही सांगीतले . तसेच
स्वाती नाईक यांनी पदार्थ जास्त पोषक कसे बनवायचे ते सांगितले.
संगीता पाटील यांनी भाज्यांचा व कडधान्य वापराने आहारात लोह कसे वाढवता येते असे सांगितले.
स्पर्धेतील विजेते.. पुजा वारके, कविता सुरवाडे, मिनाक्षी नेहते, चेतना नारायण, जयश्री भारंबे, सरला येवले( पोषण सप्ताह वर स्वरचित गाणे)
यांना बक्षिसे देण्यात आली.
या प्रसंगी मंडळाच्या
किरण चौधरी, संगीता पाटील , लता होसकोटे स्वाती नाईक, वैशाली भगत, स्वाती भोळे, मंगला पाटील, अनिता कवडीवाले, कीरण शुक्ला, यांचेसह महिला उपस्थित होत्या.
साकरीच्या रेखा गायकवाड, साकरी येथील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले
मदतनीस जयश्री भारंबे, दिपाली बोदर यांनी योजने वर आधारित स्वरचित गाणे म्हटले



