भुसावळ- भुसावळ शहरातील जामनेर रोडलगत दत्त धाम समोरील नाल्यात पडलेल्या गोमातेस गोसेकांनीं सुखरूप बाहेर काढून जिवदान दिले .
गोसेवा परिवारास गोमाता पडल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी गोसेवक रोहित महाले व सहकारी पोहचले
अर्ध्या तासापासून नाल्यात अडकलेल्या गोमातेला गोसेवक रोहित महाले यांनी नाल्यात उतरुन गोमातेला बांधले व बाहेर काढले यावेळी गोसेवक सहकारी पंकज कलाल,रोहित कचरे,सावन अग्रवाल,नाना पाटील,मनोज जगताप,यश प्रजापत,एंकाशु पाटील, तसेच श्रीकृष्णा नगर व दत्तधाम मंडळ येथील रहिवासी बांधव या सर्वांच्या मदतीच्या सहाय्याने गोमातेला नाल्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले .लंम्पी आजाराला न घाबरता देवदूत बनून अहोरात्र सेवा गोसेवक करीत आहे .

यावेळी जळगाव येथील पत्रकार प्रकाश पाटील , गोसेवक विजय पाटील , यांनी देखील कार्याची दखल घेतली आणी सद्देव सोबत राहुन भुसावळला गोशाळा उभारणीसाठी गोसेवकांचे मदतीसाठी पुढाकार घेवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
याबद्दल सर्वाचे ह्रदयापासुन गोसेवा परिवाराने आभार मानले आहे .


