पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वछता कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव .

भुसावळ
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रl मोदीच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर पर्यंत आयोजित सेवा पंधरवाडा निमित्त श्री. नमो विचारमंच, साईनिर्मल फॉउंडेशन व रुपेश देशमूख मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता पुरस्कार दूत सन्मान 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी श्री नमो विचार मंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शिशिर जावळे, नगरसेवक पिंटू ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व स्वच्छता कर्मचारी हा सुद्धा समाजव्यवस्था,आरोग्य व शहर विकासाचा एक मुख्य कणा असून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता सर्वांना चांगली स्वच्छता व आरोग्य प्राप्त व्हावे मिळावे यासाठी अहोरात्र स्वच्छता सेवा करीत असणारे स्वच्छता कर्मचारी खऱ्या अर्थाने या समाजाचे हिरो आहेत अभिनेते आहेत म्हणून आज त्यांना सन्मानित करून त्यांचा आदर सन्मान वाढावा व समाज,जनतेने या उपक्रमाचा आदर्श घेऊन त्यांच्याशी सन्मानाने वागणूक द्यावी असे प्रतिपादन याप्रसंगी मान्यवरानी मनोगतातून व्यक्त केले.व्यक्त केले.
यावेळी इतर मान्यवर म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर नगरसेवक पिंटू ठाकूर, समाज सेवक रुपेश देशमुख, डॉक्टर राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे जळगाव जिल्हा सचिव चंद्रशेखर आनंदा पाटील, गंगाराम नन्नवरे, व भुसावळ नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हॉट पोट टी चे संचालक अर्जुन भैय्या मदन दास,मोहन कासार आर के कोळी, कपिल पहुरकर,देवेंद्र वराडे,साई निर्मल फॉउंडेशन अध्यक्ष शिशिर जावळे आदींनी परिश्रम घेतले.