वरणगाव -शहरातील अपंग, विधवा, परितक्त्या बेसहारा दिव्यांग महिलांना शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ट करा तसेच केसरी कार्ड धारकांना 12 अंकी नंबर देऊन त्यांचा धान्याचा कोठा वाढविण्यात यावा, या मागणीसाठी आज शुक्रवारी वरणगाव शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दिपक धीवरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगाव शहराची लोकसंख्या 50 हजाराच्या जवळपास आहे. यामध्ये अपंग विधवा परितक्त्या, बेसहारा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना शासनाच्या 35 किलो स्वस्त धान्य अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा. ते या योजनेपासून वंचित आहे. तसेच केसरी रेशन कार्ड धारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून गरीब गरजूच्या कार्डवर 12 अंकी नंबर देऊन त्याचा धान्याचा कोठा वाढून द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तसेच वरणगाव शहरात पुरवठा विभागाचा कॅम्प लावून एकाच दिवशी एकाच छताखाली दिव्यांग बांधवाना बोलवून त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून त्यांना तहसीलच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. यावेळी तहसीलदार दीपक धीवरे यांनीही या मागणीला सकारात्मक चर्चा करून लवकरच वरणगावला कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्याक संघटक सईद मुल्लाजी, उपशहर प्रमुख सुनील भोई, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, तालुका अल्पसंख्याख संघटक मोहसीन खान, विभाग प्रमुख आरीफ मन्यार, शेख सत्तार बाबू, वैभव लोखंडे, सुकलाल धनगर, दिपक शेडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


