संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा ; गाडगेबाबांना अभिप्रेत समाजनिर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा संयमित वापर करत अभियंत्यांनी राष्ट्र उभारणीला बळ देणे अपेक्षित – प्राचार्य डॉ आर बी बारजिभे :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला . ह्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी भारत मातेच्या सुसंस्कृत जडणघडणीसाठी आणि एकात्मिक समाजनिर्मितीसाठी हिन्दी भाषा मोठी भूमिका निभावते असे सांगितले. एकूणच भाषा विकासासाठी ग्रंथालयांचा विकास आणि प्रसार करून वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबांना अभिप्रेत समाजनिर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा संयमित वापर करत अभियंत्यांनी राष्ट्र उभारणीला बळ देणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा प्रसार आणि ज्ञानग्रहण भारतीय भाषांच्या माध्यमातून अधिक सहज करण्यासाठी भावी अभियांत्रिकी तंत्रज्ञांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आय. क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, ग्रंथालय समिति प्रमुख डॉ. अजित चौधरी, ग्रंथपाल श्री. पी. एस. भट, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा. ए. व्ही. पाटील, डॉ.एस. बी. ओझा, प्रा. प्रशांत बजाज,डॉ. प्रिती सुब्रमण्यम, प्रा. डि. जी. अग्रवाल, प्रा. नितीन खंडारे, डॉ.युवराज परदेशी यांची उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.