पुणे – विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन विशेषच्या कालावधीला मुदतवाढ :

पुणे आणि विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार :

01921 विशेष दि. 06.10.2022 ते 10.11.2022 (6 फेऱ्या) दर गुरुवारी चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

01922 विशेष दि. 05.10.2022 ते 09.11.2022 (6 फेऱ्या) दर बुधवारी चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

या विशेष ट्रेनची संरचना, वेळ आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण: विशेष ट्रेन क्र.01921च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 14.09.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.