भुसावळ – गोसेवक रोहित महाले व साईभक्त तथा पिंटू कोठारी यांच्या मदतीने शिर्डी येथून चुकलेल्या अपंग वाटसरुस आपल्या गावी जाण्याचा मार्ग दाखवून त्याला अन्न देवून खर्चास पैसे देवून माणुसकीचे दर्शन घडविले .
येथील मामाजी टॉकीज परिसरातील सावन वडा पाव सेंटर जवळ आज सकाळी अंपग अवस्थेत एक गृहस्थ
शिडीॅ येथून पायी पायी चालत मामाजी टाॅकीज जवळ आला व सावन वडापाव नास्ता सेंटरवर रडु लागला यावेळी सावन अग्रवाल यांनी
गोसेवक तथा प्राणीमित्र रोहित महाले यांच्याशी संम्पर्क साधलास असता तात्काळ गोसेवक रोहित महाले व सहक़ारी पोहचले त्यावेळी त्यांनी त्यांची चौकशी केली . कोठुन आले तुम्ही रडु नका तुम्हाला पुर्ण मदत होईल आपली असे सांगीतले तेव्हा वाटसरू बर्रापुर येथील बोरखेडा गोमंठी येथील रहिवासी असल्याचे समजले .
दरम्यान साईसेवक पिन्टु कोठारी यांच्या माध्यमातुन सेवेकरी साईभक्त मनोज पाटील यानीं त्या बांधवास कपडे जेवण देवून त्यांचे गाव बर्रापुर येथील बोरखेडा गोमंठी येथे जाण्याची व्यवस्था करुन दिली . यावेळी शिवसैनीक बाळु भोई,कुणाल शिंदे, सावन अग्रवाल,रोहित महाले व समस्त गोसेवक बांधवयांनी
माणसाने माणुसकी जपत
मानवता धर्म पाळला. तसेच गरतवंताला मदत करत रहावी असे मनोगत रोहित महाले यांनी
व्यक्त केले .



