लातूर जुनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जळगाव संघाचा सहभाग

भुसावळ :-टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यताने टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ लातूर तर्फे आयोजित २२ व्या ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा रवाना झाला आहे. जिल्हा संघाची निवड साठी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ जळगाव तर्फे निवड चाचणी घेण्यात आली होती. निवड झालेल्या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवलकर, शकील पटेल, जिल्हा सचिव वासेफ पटेल, प्रा. आसीफ खान, संजय चौधरी, विनय काळे गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे प्रा. आनंद उपाध्याय यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्याचा संघ असा

दिव्येश पाटील, कुणाल परदेशी, शॉन बोदडे, पियुष चव्हाण, मोहित भोई, ह्यरिदांक रत्नानी ,हर्ष पाटील, अबुजर पटेल, हुजेफा देशमुख, समीर चौधरी, सुरज चव्हाण, यश मेहरा, प्रणव फिरके, आदित्य पाटील. तन्मय दाभाडे (प्रशिक्षक) प्रतिक कुलकर्णी (व्यवस्थापक) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड २१ सप्टेंबर पासून हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात होणार आहे.

.