रावेर – रावेर परिसरात आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने खरीप पिकांचे लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे .
शनिवार १० रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला अचानक विजांचा कडकडाट सुरू होऊन तासभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने रावेर परिसरातील ऐन कपंनिस आलेले मक्याचे पिकासह, कापूस ,केळी जमीनदोस्त होऊन लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे केळी पिकावर सी एम व्हींव्हायरस, कापसावर अड्यांचा प्रादुर्भाव, तथा गायी म्हशी वर लांपी या संसर्ग जन्य रोगामुळे आधीच हैराण झालेल्या बळीराजावर ऐन कापणी स आलेल्या मका जमीनदोस्त झाल्याने मोठे संकट. उभे ठाकले आहे .
बळीराजा पूर्णतः हतबल होऊन कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी शासकीय स्तरावर नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .



