भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हनून जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी १० वा. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यiनी याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करुण तसेच द्वीपप्रज्वलन करुण कार्यक्रमाला सुरवात केली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थीनिं तर्फ शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त करण्यात आले.तसेच विवीध गेम्स पण घेण्यात आले.
प्रिसिपल निना कटलर यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे बाबत मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन तनूजा कवठे,अनिकेत सपकाळे,दिक्षा राज वैदय,पार्थ बावस्कर, अनवी यावलकर, विभव धांडे,मधुरा कुळकर्णी,तेजस्वीनी तंडन,ओजस्वी सायवान,जय जैन, साईश्री बाणाईत, हार्दिक चौधरी यांनी केले.तर
आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.



