ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वी निमित्त विविध कार्यक्रम.


भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसइ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्याचे 75 वी निमित्त शुक्रवारी देशावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले.यात भगतसिंग व राजगुरू यांना फाशीची शिक्षा चा लाईव्ह दृश्य विद्यार्थ्यां मार्फत दाखवण्यात आला. तसेच वंदे मातरम व प्यारा तिरंगा अशा गाण्यांवर विद्यार्थिनींनी नृत्य केले तसेच ज्यां स्वातंत्र्यासाठी जीव गमावा लागला अशांना श्रद्धांजली देण्यात आली.तसेच लहान बालगोपालांनी विविध रूप धारण करून शाळेमध्ये आपले मत मांडले यात भगतसिंग, महात्मा गांधी,इंदिरा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पंडित जवारलाल नेहरू,राणी लक्ष्मीबाई,स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा विविध महान नेत्या सारखे कपडे परिधान करून विद्यार्थ्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. त्याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर तसेच शिक्षिका सोनाली मुजुमदार,स्मिता जाधव,वंदना मेढे,भारती मेढे,श्वेता जोशी,सुरिंदर कौर,अनिता खडसे,दीपाली बडगुजर,कल्पना वारुळकर,जसीम बाबू,कविता इंगळे, अनिता शिंदे, पोर्णिमा भोळे, अंजली जोशी, माधुरी कोळी, बर्नाडित रॉस,मार्था राठोड,स्वाती तावरे, पुनम फालक,सुनीता वाणी,रेखा मावळे, सुवर्णा राजपूत, आरती पाचपांडे, अभिषेक राठोड,व्हर्जिनिया बर्नड,मोतीमेरी जॉन, स्मिता नंन्नवरे,फे डिसौजा,आयुषी अग्रवाल,नेहा वाघमारे,रुठ क्लेमसी
सह इतर शिक्षिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दीपक चौधरी व सोनीया टेकवाणी यांनी परिश्रम घेतले.