रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॅली :

भुसावळ – भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना भुसावळ शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स च्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आणि पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी झेंडी दाखवून सुरुवात केली.

यावेळी बोलतांना सोमनाथ वाघचौरे यांनी रोटरी रॉयल्स चा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून देशाभिमान जागृत करण्यासाठी विविध उपक्रम झालेच पाहिजेत असे सांगून रोटरी क्लब रॉयल्स व सर्व शालेय विद्यार्थी व सहभागी नागरिकांचे कौतुक केले. विद्यार्थी व नागरिकांच्या भारत माता की जय व आदी घोषणांनी शहर दणाणून सोडले. ठिकठिकाणी लोक रॅली चे फोटो व व्हिडीओ चित्रण करत होते. सगळीकडे देशभक्तिमय वातावरण झाले होते.
रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॅलीमध्ये शहरातील डी एल हिंदी विद्यालय, बियाणी स्कूल, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, ताप्ती पब्लिक स्कूल, महाराणा प्रताप विद्यालय, आदर्श हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल ह्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षक तसेच शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गजानन पडघम,दिपनागर औष्णिक केंद्राचे माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर, रोटरी माजी प्रांतपाल राजीव शर्मा, पिंकेथॉन, महिला क्रीडा मंडळ, जय गणेश जेष्ठ नागरिक संघ, अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघ, राधाकृष्ण प्रभात फेरी आदी समाजसेवी संस्थांचे सदस्य तसेच शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॅली चे आयोजन व यशस्वीतेसाठी रोटरी रॉयल्स चे अध्यक्ष प्रसन्न पांडे, सचिव सागर विसपुते तसेच उमेश नेमाडे, राजेंद्र यावलकर, गणेश फेगडे, लोकेश कन्सल, अनंत वाटपाडे, विनोद तायडे, धीरज मुळे,किरण पाटील, , अमित जैन, डॉ. सुरज भोळे, सौरभ अग्रवाल, मोहन पाटील, महेश फालक, डॉ राजेश मानवतकर, भुपेंद्र शर्मा, महेश झंवर आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.