u

मुक्ताईनगर – तालुक्यातील चिंचोल येथे राहणारी प्रतीक्षा श्रीराम महाजन या तरुणीने 1 मिनिट 17 सेकंदात दोन कलर वापरून फक्त बोटांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली होती याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली न तीला प्रमाणपत्र देवून सन्मानित केले .
यामुळे मुक्ताईनगर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे मुक्ताईनगर तालुक्यातून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली हि पहिलीच तरुणी असल्याचे बोलले जात असुन तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे


