भुसावळ – येथील तापीपुलाकडुन येणारी कार क्रमांक एम एच१९ बी यू ५६७५ गांधी पुतळाकडे येत असतांना समोरुन येणाऱ्या गाडीचे फोकस लाईट अचानक चमकल्यामुळे चालकाचे स्टेयरिंगवरील नियंत्रण सुटले व कार दुभाजकावर जावून आदळली.
याअपघातात चालक बाजू कडील टायर फुटल्याने कार मधील तीन जण जखमी झाले. त्या वेळी तेथून माजी नगरसेवक पिंटु कोठारी हे जात होते. त्यानी लगेच कार मधील जखमींना खाजगी रुग्णलयात दाखल करून मदत केली .
त्या नंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले
.जखमी हे जळगांव पिंप्राळा येथील निवासी असुन रणजित पाटील,भावेश पाटील व इतर एक व्यक्ति असे आहे. ही घटना दि. १३ रोजी सांयकाळी ७:४५ वा.गांधी पुतळ्या कडे घडली
अपघात स्थळी शहर पोलिसांनी सुद्धा त्वरित जावून मदत केली.



