नशिराबादजवळ एक कोटींचा गांजा जप्त : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई :


‎जळगाव – नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील तिघ्रे या गावातून जळगाव गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ८८५ किलोग्रॅम वजनाचा व सुमारे एक कोटींपेक्षा अधिक रुपये किंमतीचा ओला गांजा एका घरातून जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नशिराबाद हद्दीतील तिघे या गावातील एका घरातून सुमारे ८८५ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली तर मंगळवारी दिवसभरात यंत्रणेने पंचनाम्यासह गांज्याची मोजदाद केली. या धाडसी कारवाईमुळे अवैधरीत्या गांजा तस्करी करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली असून म्होरके अंडरग्राऊंड झाल्याचे बोलले जात आहे .
या प्रकरणी आज (दि. ५) रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आजवरच्या कारवाईत ही सर्वाधिक मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. या कारवाईने अवैधरीत्या गांजा तस्करी करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे .

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रभारी जळगाव सर्किट,उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग सोमनाथ वाघचौरे, पोनि अमोल देवधे, युनूस शेख इब्राहिम, वसंत ताराचंद लिंगायत,रवी नरवडे, पोहेकॉ सुनील दामोदरे, कमलाकर भालचंद्र, दीपक पाटील,अक्रम शेख, संदीप साबळे, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, रमेश जाधव, विजय चौधरी, दर्शन ढाकणे, किरण बाविस्कर आदींच्या पथकाने कारवाई केली.