देवी कालि मातेचे धूम्रपान चे पोस्टर प्रदर्शित करणाऱ्या लीना मनिमेकलईवर कारवाई करा -शिशिर जावळे यांची कॅनडा दुतावास, केंदीय गृहमंत्री सह, मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी :

भुसावळ:- कॅनडा मध्ये स्थित मूळ ची भारतीय महिला मणीमेकलई हिने नुकताच कालीनावाची एक चित्रपट (डॉक्युमेंट्रि )च्या पोस्टर मध्ये हिंदूचें श्रद्धास्थान असणाऱ्या देवी कालिका माता चक्क सिगारेट ओढतांना दाखविले आहे. आणि यासोबत तिने या पोस्टर मध्ये देवीच्या एका हातात LGBTQ नावाच्या समुदायाचा झेंडा सुद्धा दाखविलेला आहे. त्यामुळे कैनेडा मधील हिंदू सह संपूर्ण जगातील करोडो हिंदूंच्या धार्मिक भावना यामुळे दुखावलेल्या आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर हिंदूना व त्यांच्या देवी देवतांचा अशा पद्धतीने अपमान करुंन संपूर्ण जगात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या काली चित्रपटाची निर्माती च्या हिंदुविरोधी लीना मणीमेकलई ला त्वरित अटक करून तिच्यावर त्वरित कडक कारवाई करावी.तसेच

1) भारत सरकारने कॅनडाच्या राजदूताला बोलावून कॅनडाच्या सरकारने कला आणि संस्कृतीच्या नावाखाली हिंदुविरोधी कारवायांसाठी दिलेला निधी थांबवावा अशी मागणी केली पाहिजे.
2)भारत सरकारने कॅनडाने आपल्या हिंदू अल्पसंख्याकांच्या धार्मिक हक्क आणि भावनांचे रक्षण करण्याचे वचन द्यावे अशी मागणी केली पाहिजे.
3)लीना मनिमेकलाई हिचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, देवी कालीचे अपमानास्पद चित्रण केल्याबद्दल तिला अटक करून जाब विचारण्यात यावा.
4) काली हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यावर त्वरित बंदी घातली पाहिजे.
असे मागणी निवेदन सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी कॅनडा येथील भारतीय दुतावास,भारताचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांना एका निवेदना द्वारे केली असल्याच त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.